बहुजन सुखाय, बहुजन हिताय - प्राचार्य शिवाजीराव भोसले

मदास हे स्वामीजींच्या देशयात्रेतील महत्त्वाचे ठिकाण मानावे लागेल. परदेशी जाताना मदास स्वामींच्या पाठिशी उभे राहिले. परत आल्यावर ते पुन्हा आपल्या भक्तिभावानिशी स्वामीजींच्या पुढे उभे राहिले. स्वामीजीनी आपल्या काही गुरुबंधूंना मदास येथे जाऊन रहावयास सांगितले.

मदास येथे त्यांनी दिलेल्या व्याख्यानांतून त्यांच्या राष्ट्रविषयक, वेदान्तविषयक भूमिकेचे विस्ताराने विशदीकरण घडले.

भारतीय चुकले कोठे आणि त्यांनी चूक दुरुस्त करावी कशी हे मातेच्या ममतेने व पित्याच्या निष्ठुरतेने स्वामीजींनी लोकांना समजावून दिले.

हिंदूंनी धर्म हे सोवळ्याओवळ्यांचे गाठोडे करून टाकले. तपशीलाचे अवडंबर माजवून तत्त्व नजरेआड केले. स्त्री-शक्तीची उपेक्षा केली. केवळ सुभाषितात स्त्रियांना मोठेपण दिले. प्रत्यक्ष जीवनात त्यांना अक्षरश: स्थानबद्ध केले, हतबुद्ध करून टाकले. त्यांना शाळेत जाऊ दिले नाही. पुस्तकांना स्पर्श करू दिला नाही. स्वामीजींनी भगिनी निवेदितांना स्त्री-शक्ती उपासनेचे कार्य करावयास सांगितले. ज्यांना लोकनेते 'मासेस' म्हणतात, जनता जनार्दन असे संबोधतात ती अठरापगड प्रजा या देशात भरडली जाते आहे. सामाजिक परिवर्तनाचे चक्र सतत फिरत राहते. आज जे तळाशी आहेत ते उद्या उमाठ्यावर येऊन तळपणार आहेत. जगभर हा बदल घडणार आहे. उद्याचे राज्यकतेर् हे आजचे जनसामान्य आहेत. 1897 साली केलेल्या भारतीय भाषणांत स्वामीजींनी जनराज्याची, लोकराज्याची कल्पना संक्षेपाने पण नि:संदिग्धपणे मांडली आहे. उच्चवणीर्यांनी आपल्या अहंतेचे विसर्जन करावे असा परखड सल्ला दिला आहे.

स्वामीजींनी या विवेचनात वापरलेले शब्द 'श्चद्गह्म1द्गह्मह्यद्बश्ाठ्ठ श्ाद्घ क्रद्गद्यद्बद्दद्बश्ाठ्ठ' 'हृद्गद्दद्यद्गष्ह्ल श्ाद्घ रूड्डह्यह्यद्गह्य' 'हृद्गद्दद्यद्गष्ह्ल श्ाद्घ 2श्ाद्वद्गठ्ठ' असे आहेत.

भारतीयांच्या समाजव्यवहारात व सार्वजनिक जीवनात सचोटीचा अभाव आढळतो. दुधात पाणी, धान्यात माती, सोन्यात तांबे मिसळण्याचा मोह आम्हा भारतीयांना का पडावा? क्षेत्राच्या जागीसुद्धा लबाडी. भाबड्या लोकांची अक्षम्य लूटमार घडते ती आपल्या मठामंदिरांतून. दिला शब्द पाळणे, वेळेवर काम करणे, सतत कर्तव्यदक्ष राहणे भारतीयांना जमत नाही. ही जीवनमूल्यांची प्रतारणा आहे.

भारतीय युवकांना उद्देशून ते वारंवार म्हणाले : मैदानी आणि मर्दानी खेळांत रममाण व्हा. नाजूकपणा सोडून द्या. पोलादी स्नायू आणि निकोप नसा हे तुमचे जीवनदव्य होऊ द्या. 'स्ह्लह्मद्गठ्ठद्दह्लद्ध द्बह्य द्यद्बद्घद्ग, 2द्गड्डद्मठ्ठद्गह्यह्य द्बह्य स्त्रद्गड्डह्लद्ध.' स्वप्नरंजनात रमू नका. व्यसनाच्या व्यसनाच्या आधीन होऊ नका. पराक्रम, पुरुषार्थ या शब्दांवर प्रेम करा. केविलवाणे होऊ नका. रडगाणे गाऊ नका. उठा पोरांनो उठा, माझ्या बाळांनो उठा. देशाच्या भवितव्याचे शिल्पकार तुम्ही आहात. अमृताच्या पुत्रांनो उठा! स्वामीजींच्या आवाहनातील हा सामाजिक आशय काही कर्मठांना रुचला नाही. धर्मपरिषदेत बोलणाऱ्याने धर्म सांगावा. समाजकारण हे सन्याशांचे का काम आहे? असा प्रश्ान् उपस्थित करणारे कोणीच नव्हते असे नाही. पण त्यांचा प्रभाव ओसरत गेला. सर्व काळी आणि सर्व लोकी अंधश्रद्धांची अरेरावी ही आचारविचारांच्या मार्गातील धोंड ठरली आहे.

स्वामी विवेकानंद हा विचारांचा धबधबा होता. धबधबा कोणाला वाट पुसत नाही. खळाळत, उसळत तो पुढे जात राहतो. त्याचे पात्र तो तयार करतो. स्वामीजींची एक खंत त्यांनी वारंवार व्यक्त केली. भारतात संस्थात्मक जीवन क्षीण होत चालले आहे. लोकांना संघटित होणे जमत नाही. सवतेसुभे थाटून, एकमेकांना शह देणे व परस्परांच्या प्रयत्नांना छेद देणे हा लोकछंद झाला आहे.

ज्याला जग राजकारण म्हणजे त्यापासून स्वामीजी कटाक्षाने दूर राहिले. त्यांच्या काही समकालीन हितचिंतकांनी त्याना राजकारण प्रवेशाची विनंती केली. स्वामीनी आपली नापसंती निर्भयपणे व्यक्त केली. प्रथम व्यक्ती आणि समाज यांना घडवू देत. त्यासाठी मी तपाच्या वाटेने जाईन. युवकांना माझ्या मागे नेईन. त्यांना दिशा समजावून देईन. नंतर आशीर्वादपूर्वक त्यांनाही निरोप देईन व जगाचा निरोप घेऊन माझ्या गुरुदेवांकडे मी निघून जाईन.

स्वामीजींचे बोलणे, चालणे, वागणे तसे विलक्षणच वाटत असे. ते त्यांच्या मोठेपणाचे लक्षण होते. जीवमात्रातील दिव्यत्वाचे ते उपासक होते. या दिव्यत्वाच्या परित्राणासाठी ते प्रयत्नशील होते. एक व्यक्ती म्हणून ते मुक्त होते. जनकल्याणासाठी ते कटिबद्ध झाले. जगाच्या कल्याणासाठी बद्धता पत्करणारे ते दुसरे बुद्ध होते. 'बहुजन हिताय। बहुजन सुखाय' धर्मचक्रप्रवर्तन. ते एक थोर भारतीय होते.

( क्रमश:)

- प्राचार्य शिवाजीराव भोसले