विवेकानंदांना कांही धर्मनिष्ठांनी विचारले : ''तुम्ही
धर्म आणि संस्कृती याचे अभिमानी! असे असताना तुमची सगळी भाषणे तुम्ही
इंग्लिशमधून केलीत ती कशी? तुम्ही संस्कृतमधून बोलला असता तर प्राचीन
पांडित्याची परंपरा अधिक संपन्न झाली असती.
या प्रश्ानचे साधे सरळ उत्तर असे होते : इंग्लिश ही जगाने
स्वीकारलेली आंतरराष्ट्रीय बोधभाषा आहे. संस्कृत ही भारतातील सर्वश्रेष्ठ
भाषा असूनही ती लोकभाषा होऊ शकली नाही. येथून पुढे जे विचारमंथन, विवरण व
प्रतिपादन घडेल ते इंग्लिशमधून घडेल. आजची जी ज्ञानपीठे आहेत ती काशी, कांची
किंवा उज्जैन येथे नाहीत. शिकागो, न्यूयार्क, लंडन, हार्वड, केंब्रिज ही
'विद्यावैभव स्थाने' झाली आहेत. संस्कृतचे आदर्श अभ्यासक हेसुद्धा परदेशात
भेटू लागले आहेत.
ज्ञानेश्वर, भगवान बुद्ध, भगवान महावीर यांनीही
संस्कृतचा अट्टाहास बाळगला नाही. किंबहुना लोकांच्या आकलनकक्षेत जी विस्तारत
राहील तीच खरी अनुरूप ज्ञानभाग होय.
भारतीय तत्त्वज्ञान जगाला
समजावून देणारे अलीकडचे भारतीय विद्वान आणि विचारवंत हे इंग्लिशचे जाणकार
होते. काँग्रेसचे प्रारंभकाळातले प्रथम श्रेणीचे नेते हे इंग्लिश भाषेचे
जाणते अभ्यासक होते. गांधी, नेहरू, टागोर, विवेकानंद हे इंग्लिश भाषेतून लिहू
शकले. डॉ. राधाकृष्णन्, डॉ. दासगुप्ता, एम्. एन्. रॉय यांची व्यासंगधारा
इंग्लिश भाषेच्या पात्रातून वहात राहिली.
स्वामी विवेकानंद आणि
गुरुदेव टागोर यांनी बंगालीतूनही लेखन केले; पण ते त्या रूपात जगापर्यंत
पोहोचले नाही. गीतांजलीने जेव्हा इंग्लिश वस्त्रे परिधान केली, तेव्हा ती
नोबेल पारितोषिकासाठी विचारात घेतली गेली. ही सर्व कालसापेक्षता विचारात
घेतली नाही तर व्यवहारशून्यता पदरी पडेल हे उघड आहे.
स्वामीजींनी
आपल्या कांही पत्रांतून आपले मनोगत व्यक्त केले आहे. त्यांची पत्रे ही बोलकी
भावचित्रे होत. आलालिंग पेरूमल या आपल्या निष्ठावंत मदासी मित्रास
स्वामीजींनी एका पत्रातून आपली आकांक्षा समजावून दिली ती अशी : ''प्राचीन
विद्येतील गहनता आणि योगविद्येतील गूढता दूर झाली पाहिजे. मुलांना वेड
लावणाऱ्या फुलपाखराप्रमाणे ती आकर्षक आणि मनोवेधक झाली पाहिजे. पुराणांचा
पसारा आवरला पाहिजे. न सुटणाऱ्या गाठींचे भेंडोळे म्हणजे वेदान्त ही एक
प्रकारची अवकळा आहे. धर्माला ग्लानी येणे म्हणजे धर्मतत्त्वांच्या होय.''
स्वामीजी म्हणत वेदान्ताच्या
दुंदुभी चौकाचौकात वाजल्या पाहिजेत.