संस्कृतीचे जन्मस्थान - प्राचार्य शिवाजीराव भोसले

प्रत्येक महापुरुषाची माता ही त्याच्या जीवनातील एक शक्ती असते. स्वामीजींच्या पाठीशी ती होती. कोलकत्त्यातील विख्यात दत्त कुटुंबात वावरणारी, एका कायदेपंडिताची पत्नी! आपणाला गुणसंपन्न पुत्र लाभावा अशी काशी विश्वेश्वराच्या चरणी तिची प्रार्थना होती. तिने तसा नवसही केला होता. विश्वेश्वराला लक्ष बिल्वदले वाहिली होती.

या आपल्या आईला आपण सुख देऊ शकलो नाही याची स्वामीजींना हळहळ होती.

अमेरिकेत स्वामीजींची व्याख्याने गाजत होती. त्याच काळात त्यांचा दुस्वास करणारे काही धर्मपंडित त्यांची अखंड निंदानालस्ती करीत होते. त्यांनी तर उघडउघड एक आघाडीच उभी केली होती.

आपला देश, आपला धर्म, आपली आई ही आपली श्ाद्धा स्थाने! आपले गुरू हाच आपला देव! या अमूर्त शक्ती पाठीशी आहेत अशी भावना अंतर्यामी ठेवून स्वामीजी आपले काम करीत होते. हे काम देशापासून दूर कोठे तरी चालू होते.

9/4/94 या दिवशी लिहिलेल्या एका मनोगतात ते म्हणतात : I have made a good many friends here. But orthodox clergymen are against me. They try to hinder, abuse and vilife me in every way हे निर्दय पादी आणि धर्माधिकारी माझ्यावर तुटून पडतात. समोर कधी येत नाही. पण सतत पाठपुरावा करतात. अशा क्षणी स्वामीजींना आपल्या आईची आठवण येई. आपल्या वृद्धापकाळी मुलावर आपला भार न टाकता आपला दु:खभार ती पेलत राहिली. तिने आपले पोर देशाच्या आणि देवाच्या पायी वाहिले. She could bear to give me up for the service of God and man.

स्वामीजी परदेशातून परत आल्यावर जगदंबेला केलेला नवस फेडण्यासाठी आई गंगास्नानासाठी निघाली तेव्हा स्वामीजी लहान मुलाप्रमाणे आई मागोमाग गेले. कोलकत्त्यावरचे ते आकाश आपल्या आपल्या अनंत जिव्हांनी निनादात राहिले : जय नरेंद! जय भुवनेश्वरी! जय जय रामकृष्ण, जय विवेकानंद!

त्याच दिवशी स्वामीजींनी आपल्या वहीत केलेली एक नोंद अशी : I belive that saty-yuga will come. पण हे सत्ययुग ओळखावयचे कसे? Then there will be one caste, one veda and peace and harmony.. सर्वांची जात एक, अवघी मानव जात एक! सर्वांचा ग्रंथ एक, वेद एक! सगळे सगळे सुखी आणि सगळे जग शांत!

दुरिताचे तिमिर जाईल. विश्व स्वधर्मसूयेर् पाहील. कुठे भारत, कुठे अमेरिका, कुठे नरेंद, कुठे भुवनेश्वरी! महापुरुषांचे मत हेच संस्कृतीचे जन्मस्थान.

( क्रमश :)

- प्राचार्य शिवाजीराव भोसले