विवेकानंद एकाच गावी, एकच दिनचर्या स्वीकारून आहारविहाराची
पथ्ये सांभाळून, वेळच्या वेळी औषधे घेऊन राहिले असते तर आणखी अनेक वषेर् जगू
शकले असते. चाळीसाव्या वषीर् त्यांनी जग सोडले. तेवढ्या काळात त्यानी सगळा
भारत फिरून पाहिला. दोन वेळा स्वामीजी अमेरिकेस जाऊन, तेथे राहून आले.
इंग्लंड आणि युरोपचा काही भाग त्यांनी जवळून पाहिला पॅरिसच्या जागतिक
धमेर्तिहास परिषदेस ते उपस्थित राहिले. तेथे त्यांनी भाषणे केली; राजयोग,
ज्ञानयोग, भक्तियोग या विषयावरचे ग्रंथ सिद्ध केले. अनेक महाविद्यालयात आणि
हार्वडसारख्या विद्यापीठात त्यांनी तत्त्वचर्चा केली. व्याख्याने दिली.
त्यांचा हा आवाका आणि झपाटा विलक्षण होता.
स्वामीजी संसारात पडले
नाहीत
स्त्री सुखाची निसरती ओढही कोठे त्यांच्या जीवनात आढळत
नाही; पण स्त्रियांचा सहवास कटाक्षाने टाळण्याचा विचारही त्यांनी कधी केला
नाही. सूर्यास्तानंतर, विशेषत: रात्री त्यांनी सहभोजन आणि चर्चा अशा
कार्यक्रमात रस घेतला नाही. तो वेळ आपल्या साधनेसाठी राखून ठेवला.
स्वामीजींचा दुस्वास करणारे, त्यांना पाण्यात पहाणारे, त्यांचा मत्सर
करणारे लोक कमी नव्हते. ज्ञानेश्वर, तुकाराम, सॉक्रेटीस, विवेकानंद यापैकी
कोणीही महापुरुष विरोधकांशिवाय आपले कार्य करू शकला नाही. बुद्धानांही सहनशील
व्हावे लागले.
जीवनाचे सर्व चढ-उतार पहाणे, सर्व अवस्था अनुभवणे, आणि
एक प्रकारच्या निराग्रही उत्कटतेने जीवन व्यतीत करणे त्यांना शक्य झाले.
स्वामीजी अमरनाथाच्या यात्रेला गेले तेव्हा त्यांच्याबरोबर भगिनी
निवेदिता आणि काही पाश्चिमात्य शिष्य होते. त्यांना आपले तंबू अंतरावर उभे
करावे लागले. सांप्रदायिक सन्यस्तांनी त्यांची उपेक्षा केली. हा अवमान सहन
करूनही स्वधर्म आणि स्वदेश या विषयीचा त्यांचा भक्तिभाव कधी कमी झाला नाही.
विवेकानंदाचे फोटो घरात लावणे, त्यांचे पुतळे उभे करणे, संस्थांना
त्यांची नावे देणे हे कार्य नंतर अनेकांनी केले; पण त्यांच्या साहित्याचा
अभ्यास करावा; त्यांच्या विरक्तीचे, विद्वत्तेचे यथाशक्ती अनुकरण करावे, असे
फारच थोड्या व्यक्तींना वाटले असावे. स्वामीजींनी तशी अपेक्षा बाळगली नाही.
त्यांनी जीवनावर प्रेम केले. जीवनाचा आशय ज्यावर अवलंबून आहे, त्या अनेक
परमतत्वांचे चिंतन आणि पालन केले.
जीवनाची अर्थपूर्णता ते अखंड
अनुभवत राहिले. त्यांना जीवनयोगी म्हणावे लागेल. त्यांनी नोकरी केली असती,
राजकीय पक्ष किंवा गट यांची बांधिलकी पत्करली असती, ऐहिक ऐश्वर्याचा मोह
बाळगला असता तर ते विवेकानंद झाले नसते. जर कोणाला केवळ कल्पनेने जरी तसे
व्हावे, असे क्षणभर वाटून गेले तर ते एक ''विवेकानंद स्वप्न'' ठरेल ते स्वप्न
ही जाणीवेची पौणिर्मा मानावी लागेल. मुलामुलींना असे ''विवेकानंद-स्वप्न''
अधून मधून पडावे असे वाटते.
( क्रमश :)
- प्राचार्य शिवाजीराव भोसले